उत्तर भारतात हवामान बदलाचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. दिल्लीहून उड्डाण घेणारे आणि दिल्लीत जाणारे अनेक विमानं रद्द झाली आहेत किंवा उशीराने प्रवास करत आहेत. इंडिगोच्या विमानात गेल्या दोन दिवसांत दोन घटना घडल्या ज्याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होत आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानाला १३ तासांचा विलंब झाल्यानंतर एका युवकाने भर विमानात वैमानिकाला ठोसा मारला. ज्यामुळे विमानतळ प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला. तसेच त्याला पत्नीसह विमानातून उतरविले. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवक हनिमूनसाठी पत्नीसह गोव्याला जात होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे पती-पत्नीने गोव्यात हनिमूनचे नियोजन केले. मात्र विमानाला उड्डाण घेण्यासाठी १३ तासांचा विलंब झाल्यामुळे सदर युवकाचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्याने वैमानिकाला मारहाण केली. सदर आरोपीचे नाव साहिल कटारिया असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मारहाण झाल्यानंतर त्याला विमानातून उतरविण्यात आले आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) ताब्यात देण्यात आले, अशी बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
mh 370 flight
१० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?
Gisele Pelicot
पत्नीवर १० वर्षे ५० हून अधिक लोकांकडून बलात्कार, पती आढळला दोषी; फ्रान्सला हादरवणारे सामूहिक बलात्कार प्रकरण काय?
Mumbai flight take off marathi news
विमानाचे उड्डाण रोखण्यासाठी दूरध्वनीवरून खोटी माहिती देणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा
Extortion of Rs 37 lakhs by threatening to disclose information about immoral relationship to wife
अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला देण्याची भीती घालून ३७ लाखांची खंडणी, तीन महिलांविरोधात गुन्हा
saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar why change wife name after wedding
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकरने लग्नानंतर बायकोचं नाव का बदललं? वाचा किस्सा

हे वाचा >> लग्नानंतर जोडपं फिरायला जातं त्याला ‘हनिमून’ का म्हणतात? जाणून घ्या कारण

इंडिगोचे 6E 2175 हे विमान दिल्लीतून गोव्यात जात असताना ही घटना घडली. विमान उड्डाणाला १३ तास उशीर झाल्याने सर्व प्रवासी संतापले होते. वैमानिकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सदर गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे काटरियाला काही तासातच जामीन मिळाला. जामीनावर बाहेर आल्यानंतर साहिल कटारियाने आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. तो म्हणाला की, वैमानिकाने आमची दिशाभूल केली. तसेच इतर प्रवाशांनीही अशीच तक्रार केली आहे. कुणालाही विमानाच्या उड्डाणाबाबतची योग्य माहिती दिली जात नव्हती. तासनतास वाट पाहिल्यानंतर माझे नियंत्रण सुटले आणि त्यातून ती घटना घडली.

वैमानिकाने आमची दिशाभूल केली – रशियन अभिनेत्री

दरम्यान या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या रशियन अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत घटनेची पार्श्वभूमी सांगितली. अभिनेत्री इव्हगेनिया बेलस्कायाने सांगितले की, सर्वांनीच त्या तरुणाचा वैमानिकाला मारतानाचा व्हिडिओ पाहिला असेल. पण त्यामागची घटना मी सांगते. आम्ही दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानासाठी सकाळी सकाळी पोहोचलो होतो. पण इंडिगोचे विमान उड्डाण घेत नव्हते. एक तास उशीर होईल, दोन तास होईल, असे सांगून आम्हाला दहा तास वाट पाहायला लावली. त्यानंतर आम्हाला विमानात बसवले गेले, पण तिथेही दोन तास वाट पाहावी लागली. त्यात वैमानिक येऊन माईकवर सांगत होते की, तुम्ही (प्रवासी) खूप सारे प्रश्न विचारत आहात. तुमच्यामुळे उशीर होतोय. त्यानंतर त्या युवकाने संतापून जात हे कृत्य केले. मी या घटनेचे समर्थन करत नाही. पण विमान कंपनीने प्रवाशांचीही मानसिकता समजून घ्यायला हवी. शेवटी प्रवशांमुळेच कंपनी चालत असते.

Video : विमानाला १२ तास उशीर, मुंबई विमानतळावर प्रवाशांनी जमिनीवर बसून केलं जेवण

मुंबईत इंडिगो प्रवाशांचे जमिनीवर बसून जेवण

दुसरीकडे इंडिगोच्या आणखी एका विमानामुळे गोंधळ उडाला. १४ जानेवारी रोजी रविवारी गोव्याहून दुपारी २.२५ वाजता इंडिगोच्या विमान क्र. 6E2195 ने उड्डाण घेणे अपेक्षित होते. मात्र काही तास उशीराने उड्डाण घेतल्यानंतर विमानाला रात्री ११.४० वाजता मुंबईत उतरविले गेले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी स्टेपलॅडरला विमानाशी जोडून प्रवाशांना खाली उतरण्याची विनंती केली. तसेच विमान कंपनीने टर्मिनल १ ला प्रवाशांना नेण्यासाठी बसची व्यवस्था केली. बसमध्ये प्रवाशांना जेवणाची पाकिटेही ठेवण्यात आले होते. मात्र प्रवाशांनी टर्मिनल १ ला जायला नकार दिला. अनपेक्षित थांब्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवाशांनी विमान ताबडतोब दिल्लीला नेण्याची मागणी केली. काही प्रवाशांनी बसमधील जेवणाचे पाकिट घेऊन विमानाच्या शेजारीच धावपट्टीवर बैठक मारून जेवण केले. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला असून आता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Story img Loader