अफगाणिस्तानमधील तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत. बलोच प्रांतातील चमन सीमेवर चौकी उभारण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. दरम्यान, याबाबत पाकिस्तान सैन्याकडून निवेदन जारी करण्यात आले असून कोणतेही कारण नसताना अफगाणिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा,” वरिष्ठ काँग्रेस नेत्याचं सभेत धक्कादायक विधान

मीडिया रिपोर्टनुसार, अफगाणिस्तान सैन्याकडून बलोच प्रांतातील चमन सीमेवर चौकी उभारण्यात येत होती. मात्र, त्याला पाकिस्तानी सैन्याने विरोध केला. यावरून दोन्ही सैन्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर अफगाणिस्तानच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी झाले.

हेही वाचा – भुपेंद्र पटेल घेणार आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींसह राजकीय दिग्गज राहणार उपस्थित

पाकिस्तान सरकारकडून निवेदन जारी

या गोळीबारानंतर पाकिस्तान सैन्याकडून निवेदन जारी करण्यात आले असून अफगाणिस्तानच्या सैनिकांनी रविवारी कोणतेही कारण नसताना पाकिस्तान सीमेवर अंदाधुंद गोळाबार केल्याचा आरोप पाकिस्तान सैन्याकडून करण्यात आला आहे. तसेच या गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी झाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानी सैन्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून याबाबत आम्ही अफगाणिस्तान सरकारशीही संपर्क केला असल्याचे पाकिस्तान सैन्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indiscriminate firing by afghan forces near baloch province at afghanistan pakistan border spb