बीजिंग आणि इस्लामाबादमध्ये झालेल्या कराराचा भारत-चीन संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही़ तसेच भारत आणि जपान यांच्यात झालेल्या करारामुळे आणि त्यांच्यातील सौहार्दामुळेही कोणी चिंतित होण्याची आवश्यकता नाही, असे संरक्षणमंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटले आह़े भारत-जपानमधील वाढत्या सौहार्दाबाबत चीनने व्यक्त केलेल्या नाराजीसंदर्भात ते बोलत होत़े
चीनने पाकिस्तानशी अत्यंत जवळचे संबंध असून आमचा त्यावर आक्षेप नाही, त्याचप्रमाणे चीनचे ज्यांच्याशी चांगले संबंध नाहीत अशा राष्ट्राशी आम्ही सौहार्दपूर्ण संबंध ठेवल्यास आपत्ती निर्माण होऊ नये, असे उत्तर खुर्शीद यांनी दिल़े मनमोहन सिंग जपानच्या दौऱ्यावर असताना चीनमधील एका दैनिकाने म्हटले होते की, भारताने शांततापूर्ण मार्गानेच चीनसोबतच्या समस्या सोडवाव्यात तसेच चीनला उद्दीपित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृती भारताने करू नयेत़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा