विवाहपूर्व शारीरिक संबंधांच्या घटनांना आळा घालण्यासाठी इंडोनेशिया सरकारकडून नवीन कायदा पारीत करण्यात येणार आहे. या कायद्यानुसार विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा आहे. या कायद्याचा मसुदा तयार असून पुढील वर्षाच्या सुरूवातीला हा नवा कायदा लागू होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – “दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
नव्या कायद्यानुसार, इंडोनेशियात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाने विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवल्यास एक वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा होणार आहे. तसेच हे प्रकरण न्यायालयात दाखल होण्यापूर्वी तक्रार वापस घेण्याची तरतुदही या कायद्यात करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना, ”इंडोनेशियातील मुल्यांवर आधारीत कायदा अस्तित्त्वात येण्याचा आम्हाला अभिमान आहे”, अशी प्रतिक्रिया इंडोनेशियाचे कायद्यामंत्री एडवर्ड उमर शरिफ हियरीज, यांनी दिली आहे.
हेही वाचा – पाकिस्तानचीही माणुसकी! धुक्यात भरकटून सीमापार गेलेल्या भारतीय जवानाला सुखरूप पाठवलं
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी इंडोनेशिया सरकारने अवैध शारीरिक संबंधांवर बंदी घालणारा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी संपूर्ण इंडोनेशियात या कायद्याविरोधात प्रदर्शन करण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे महिला, अल्पसंख्यक आणि एलजीबीटीक्यू समुदायांमध्ये भेदभाव करणारे शेकडो कायदे आज इंडोनेशियात अस्तित्त्वात आहेत. अशातच हा नवा कायदा लागू झाल्यानंतर हा कायदा इंडोनेशियातील नागरिकांबरोबरच इथे राहणाऱ्या विदेशी नागरिकांनाही लागू होणार आहे. या कायद्यामुळे इंडोनेशियाची प्रतिमा जगभरात खराब होईल, अशी चिंताही अनेकांनी व्यक्त केली आहे.