लैंगिक छळ प्रकरणी कारागृहात असलेले स्वयंघोषित गुरू आसाराम बापू यांचा मुलगा नारायण साई यांनी त्यांच्या एका शिष्येशी विवाह करण्यासाठी आपली फसवणूक केल्याचा आरोप इंदूरमधील एका महिलेने केला आहे.
आसाराम बापूंविरोधात पोलिसांकडे तक्रारींचा रिघ
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या विरोधात दररोज नवनवीन खुलासे होत असून, आता त्यांचा मुलगा नारायण साईही वादाच्या भोवऱयात सापडला आहे. नारायण साईच्या विरोधात या महिलेने फसवणूक आणि भीती दाखविल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावर अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नसून, पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवाच्या मोबाईलमधील क्लिपमध्ये आसाराम बापूंच्या ‘लीला’!
याआधी नारायण साई यांनी आसारामबापूंवर आरोप करणारी ‘ती’ अल्पवयीन मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे म्हटले होते. करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. परंतु, आता खुद्द त्यांच्यावरच महिलेची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झालेली असल्याने नारायण साई अडचणीत सापडले आहेत.  

Story img Loader