उद्योगविश्वात आर. पी. गोयंका नावाने परिचित असलेले नामवंत उद्योगपती राम प्रसाद गोयंका यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे ही माहिती देण्यात आली. त्यांच्यामागे पत्नी सुशीला आणि दोन मुलगे हर्षवर्धन व संजीव असा परिवार आहे.
पूर्व भारतातील जुने उद्योगपती कुटुंबीय अशी यांची ओळख आहे. केशव प्रसाद गोयंका यांचे राम प्रसाद हे ज्येष्ठ पुत्र. राम प्रसाद यांनी १९७९ मध्ये आरपीजी इण्टरप्राइजेसची स्थापना केली. फिलिप्स कार्बन ब्लॅक, एशियन केबल्स, अगरपाडा ज्यूट मिल आणि मर्फी इंडिया या कंपन्यांबरोबरच सीईएससी, सिएट, स्पेन्सर्स आणि सारेगामा या कंपन्यांचा या आरपीजी इण्टरप्राइजेस उद्योगसमूहात समावेश आहे. सन १९९० मध्ये त्यांच्या दोन्ही मुले हर्षवर्धन आणि संजीव यांनी या उद्योगसमूहाचा कारभार हातात घेतला. हर्षवर्धन हे या समूहाचे अध्यक्ष तर संजीव हे आरपीजी इण्टरप्राइजेसचे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. त्यानंतर २०११ मध्ये संजीव गोयंका यांनी आरपी संजीव गोयंका ग्रुप अशी स्वत:ची ओळख निर्माण केली. या दोन्ही ग्रुपचे राम प्रसाद हेच अध्यक्ष होते. या दोन्ही ग्रुप्सची वार्षिक उलाढाल सुमारे ३० हजार कोटी रुपये इतकी आहे.
उद्योगपती आर. पी. गोयंका यांचे निधन
उद्योगविश्वात आर. पी. गोयंका नावाने परिचित असलेले नामवंत उद्योगपती राम प्रसाद गोयंका यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांतर्फे ही माहिती देण्यात आली. त्यांच्यामागे पत्नी सुशीला आणि दोन मुलगे हर्षवर्धन व संजीव असा परिवार आहे.
आणखी वाचा
First published on: 15-04-2013 at 03:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrialist r p goenka passes away