पूंछ विभागातील नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्काराच्या जवानांनी गुरुवारी उधळून लावला. 
पूंछ विभागातील दुर्गा बटालियन भागात रात्रीच्यावेळी नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांना पाकिस्तानकडून दहशतवाद्यांचा गट घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसले. त्यानंतर जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामुळे दहशतवादी परत फिरले. घुसखोरीचा प्रयत्न फसल्याचे लक्षात आल्यावर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार करण्यात येऊ लागला. त्यालाही नियंत्रण रेषेवरील जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या गोळीबारात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला एक दहशतवादी जखमी झाल्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये घुसखोरी करण्याचा हा दुसरा प्रयत्न जवानांनी उधळून लावला. एक जुलैला घुसखोरीच्या प्रयत्नात असलेला दहशतवादी भूसुरूंगाच्या स्फोटात मृत्युमुखी पडला होता.

Story img Loader