कुपवाडा जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून मंगळवारी घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला. यावेळी लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले.
कुपवाडामधील मच्छिल क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गस्तीवरील लष्करी जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली. यावेळी लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली. जिल्ह्य़ातील हंदवारा भागातील हफ्रुडा जंगलातही सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीविरोधात लष्करी मोहीम सुरू असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी स्पष्ट केले. घुसखोरीविरोधात केलेल्या कारवाईदरम्यान लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आल्याचेही लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.मात्र संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने हेलिकॉप्टरच्या वापराबाबत माहिती नसल्याचे म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा