सेंट पीटर्सबर्ग : रशियाच्या युक्रेनविरोधातील लष्करी कारवाईमुळे जागतिक अन्नधान्य दरांत वाढ झाल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळला आणि या समस्येचे मूळ पाश्चिमात्य देशांच्या ‘आर्थिक चुकां’मध्ये हे असल्याचा प्रत्यारोप केला.

सेंट पीटर्सबर्ग येथे रशिया-आफ्रिका शिखर परिषदेत पुतीन म्हणाले की, अमेरिका आणि युरोपीय महासंघाने करोना साथ रोगाचा परिणाम म्हणून अन्न खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर चलनाचे मुद्रण केल्यामुळे अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पाश्चात्य अर्थव्यवस्थांनी करोना साथीला तोंड देण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांकडे पुतिन यांचा रोख होता.