पीटीआय, नवी दिल्ली/बंगळुरू

कर्नाटक, तमिळनाडूआणि गुजरातमध्ये ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण आढळले असले, तरी हा विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले. भारतीय वैद्याकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) एकात्मिक रोग निरीक्षण मोहिमेंतर्गत (आयडीएसपी) उपलब्ध माहितीनुसार सर्दी, शीतज्वरसारखा आजार किंवा गंभीर तीव्र श्वसनविकारांमध्ये वाढ आढळली नसल्याचे सांगतानाच परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
amit shah inaugurates 10000 newly formed multipurpose pacs
प्रत्येक गावात बहुउद्देशीय संस्थाच केंद्रीय सहकार मंत्र्यांची घोषणा, ३२ प्रकारच्या व्यवसायांची मुभा
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट

जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनमधील स्थितीबाबत वेळोवेळी माहिती मिळत आहे. श्वसनाच्या आजारांमध्ये होणारी संभाव्य वाढ हाताळण्यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा >>>Prashant Kishor : विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या प्रशांत किशोर यांना अखेर बिनशर्त जामीन मंजूर, नेमकं काय घडलं?

दरम्यान, दोन रुग्ण आढळल्यानंतर कर्नाटक सरकारनेही चिंता बाळगण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. या रुग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. तसेच ‘एचएमपीव्ही’चे हे देशातील पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही काही टक्के लोकांना विषाणूची लागण झाली होती, असे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. चीनमध्ये सध्याच्या विषाणूच्या उद्रेकात ‘एचएमपीव्ही’चा परावर्तित प्रकार असल्याचे म्हटले जात असले, तरी याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले.

देशात पाच रुग्ण

चीनसह अन्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) या विषाणूचे पाच रुग्ण भारतात आढळून आले आहेत. यात कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एक जण नियमित तपासणीमधून आढळून आला आहे. ‘ब्रॉन्कोन्यूमोनिया’चे (फुप्फुसाचा दाह) निदान झालेल्या तीन महिन्यांच्या बालिकेसह बंगळूरुमधील बाप्टिस्ट रुग्णालयात अन्य एका बालकालाना ‘एचएमपीव्ही’चे निदान झाले. या दोघांची प्रकृती स्थिर आहे. चेन्नईमध्ये दोन बालकांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदाबादमधील एका खासगी रुग्णालयात राजस्थान येथून उपचारास आलेल्या दोन महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>>२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना

एचएमपीव्ही’ची लक्षणे, खबरदारी आणि उपाय

● ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) हा श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा विषाणू

● चीनमधील साथीमुळे जगाचे लक्ष. सर्वात प्रथम २००१मध्ये रुग्ण आढळला

● खोकला, शिंका, दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्याने अथवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने प्रसार

● अर्भके, ज्येष्ठ नागरिक तसेच कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांना संसगाची शक्यता

● हिवाळ्याच्या अखेरीस, उन्हाळ्यात जास्त प्रसार

● व्यक्तींचे वय, सामान्य आरोग्य आणि प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद यानुसार लक्षणांमध्ये बदल

● सौम्य लागण झाल्यास सामान्य सर्दीसारखी नाकातून पाणी, घसा खवखवणे, खोकला आणि ताप ही लक्षणे

● मध्यम लक्षणांमध्ये सतत खोकला, घरघर लागणे आणि थकवा यांचा समावेश

● कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांना ब्राँकायटिस, ब्रॉन्कायओलायटिस किंवा न्यूमोनिया अशी लक्षणे जाणवतात

● स्वच्छता राखणे, साबणाने हात धुणे, शिंकताना अथवा खोकताना तोंड व नाक झाकणे, मुखपट्टी वापरणे यांसारखे खबरदारीचे उपाय केल्यास प्रसार मर्यादित ठेवणे शक्य

● ‘आरटीपीसीआर’ चाचणी सर्वोत्तम, ‘एचएमपीव्ही’साठी विशेष विषाणूविरोधी औषधे किंवा लस नाही. लक्षणांनुसारच उपचार

Story img Loader