हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा आणि २००७मध्ये झालेल्या स्फोटात बळी पडलेल्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा सारख्याच स्वरूपाच्या असल्याचे न्यायवैद्यक तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वेळी झालेल्या आणि गुरुवारी झालेल्या स्फोटांमध्ये बळी पडलेल्यांच्या जखमांचे स्वरूप सारखेच असले तरी २००७मध्ये झालेल्या स्फोटांची तीव्रता गुरुवारी झालेल्या स्फोटांच्या तुलनेत अधिक होती, असे दोन्ही स्फोटांच्या तपासात सक्रिय सहभाग असलेल्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. तेव्हाच्या आणि गुरुवारच्या स्फोटांमध्ये बळी पडलेल्यांच्या शरीरात लोखंडाचे तुकडे, नटबोल्ट, नखे, काचेचे तुकडे आढळून आले. लुंबिनी पार्क आणि गोकुळ येथे २००७मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना प्रत्येकी सहा लाख रुपये नुकसानभरपाई
हैदराबाद स्फोटात जखमी झाल्याने ज्यांना कायमचे अपंगत्व आले त्यांना आंध्रप्रदेश सरकारने प्रत्येकी सहा लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना यापूर्वीच प्रत्येकी सहा लाख रुपये सानुग्रह अनुदान सरकारने जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी मंत्रिगटाशी चर्चा केल्यानंतर राज्याच्या माहिती आणि जनसंपर्कमंत्री डी. के. अरुणा यांनी सांगितले की, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ११७ जखमींवर उपचार सुरू आहेत. यापैकी चार जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.