पीटीआय, नोएडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात आवश्यक असेल त्याची चौकशी होईल, यात स्वयंघोषित धर्मगुरू भोलेबाबाचीही चौकशी केली जाईल, अशी स्पष्टोक्ती रविवारी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या न्यायालयीन आयोगाचे सदस्य भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) माजी अधिकारी भावेश कुमार यांनी दिली.

आयोग याप्रकरणी लवकरच नोटीस जारी करणार असून, स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांना चेंगराचेंगरीशी संबंधित कोणतेही पुरावे, त्यांच्या जबाबासह देण्यास सांगितले जाईल, असे समितीचे अध्यक्ष तथा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल

चेंगराचेंगरीप्रकरणी आतापर्यंत मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह नऊ जणांना अटक केली आहे. आम्हाला या प्रकरणाचा चौकशी अहवाल दोन महिन्यांत दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

‘नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी’

चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच या प्रकरणात जे जबाबदार आहेत, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inquiry as required in hathras case statement of judicial commission amy
Show comments