गावचा सरपंच आणि कुंडा येथील पोलीस उपअधीक्षक झिया उल हक यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हाअन्वेषण विभागाने (सीबीआयने) उत्तर प्रदेशचा माजी मंत्री रघुराज प्रताप सिंग ऊर्फ राजाभय्या याची बुधवारी चौकशी केली.
राजाभय्याचा अंगरक्षक भुल्ले पाल याने जमाव गोळा करून बालीपूरचे सरपंच नन्हे यादव आणि पोलीस उपअधीक्षक हक यांच्या हत्येसाठी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप होता. राजाभय्याचे निकटचे साथीदार राजीव सिंग आणि गुड्डू सिंग यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
हक यांची पत्नी परवीन आझाद हिने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राजाभय्या याच्या आदेशावरून नगर पंचायतीचा अध्यक्ष गुलशन यादव, राजाभय्याचा सहकारी हरि ओम श्रीवास्तव, त्याचा चालक रोहित सिंग आणि समर्थक गुड्डू सिंग यांनी माझ्या पतीवर सळ्या आणि काठय़ांनी हल्ला चढविला आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या.