भारतीय नौदलाच्या सिंधुरक्षक या बुडालेल्या पाणबुडीवर जाण्याचा दुसरा मार्ग शोधण्यात नौदलाला यश आले आहे. दरम्यान, नौदलाच्या पाणडुब्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीसुद्धा नौदलाचे प्रयत्न सुरू असून अद्याप आणखी काही माणसांचे मृतदेह मिळतात का याचा शोध घेत आहेत.
मागील बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग पाण्याखाली बुडाल्याने तसेच उच्च तापमानामुळे बंद झाला होता. पाणबुड्यांनी पाणबुडीवर जाण्याचा दुसरा मार्ग शोधून काढला आहे. यामध्ये अडकलेल्या अठरा जणांपैकी आतापर्यंत पाचजणांचे अतिशय भाजलेल्या अवस्थेतील मृतदेह नौदलाच्या मदत पथकाने बाहेर काढले आहेत.

Story img Loader