जगातील सर्वाधिक काळ सेवेत राहणारी विमानवाहू युद्धनौका येत्या जून महिन्याच्या अखेरीस नौदलाच्या सेवेतून मुक्त
भारतीय नौदलाच्या सेवेत एकूण २९ वष्रे राहिलेली आणि जगातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५७ वर्षे कार्यरत राहिलेली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विराट’ येत्या जून महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहे.
‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची निर्मिती इंग्लंडतर्फे १९४५ साली करण्यात आली. तिचे सुरुवातीचे नाव ‘एचएमएस हक्र्युलस’ होते. ४ मार्च १९६१ रोजी ती भारतीय नौदलात दाखल झाली. त्यानंतर ‘एचएमएस हर्मिस’ भारताने ब्रिटनकडून विकत घेतली. १२ मे १९८७ रोजी ती भारतीय नौदलात रीतसर दाखल झाली. त्यानंतर १९९७ सालपर्यंत या दोन्ही विमानवाहू युद्धनौकांनी भारतासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. ‘आयएनएस विक्रांत’च्या नावावर तर १९७१च्या युद्धातील गौरवास्पद कामगिरीही नोंदलेली होती. पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर प्रत्येकी एक विमानवाहू युद्धनौका अशी भारतीय नौदलाची गरज होती.
मात्र त्यानंतर १९९७ पासून ‘आयएनएस विराट’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे उरली. तोपर्यंत िहदी महासागरातील कारवायांमध्ये वाढ होऊन तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेची गरजही निर्माण झाली होती.
खरे तर ‘आयएनएस विराट’चे आयुष्यमानही संपत आले होते, मात्र तिची डागडुजी करून वारंवार तिचे आयुष्यमान वाढविण्यात आले. आता मात्र यापुढे आयुष्यमान वाढविणे शक्य नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला. दरम्यान, ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही नौदलात दाखल झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनानंतर ‘आयएनएस विराट’ची रवानगी कोची बंदरात करून तिला निवृत्त करण्याचा निर्णय नौदलाने घेतला आहे.
मंगळवारी सुरू होणाऱ्या ‘पासेक्स’ या निरोप देण्याच्या सोहळ्यात व युद्ध कवायतींमध्ये ती सहभागी होईल. हा तिचा अखेरचा सहभाग असेल, असे नौदल सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा