राजस्थानच्या फलोदी येथून एक भयंकर प्रकरण समोर आले आहे. इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर असेलल्या एका महिलेची तिच्या पतीने दिवसाढवळ्या दुकानात घुसून हत्या केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पती पत्नीच्या दुकानात येऊन आधी वाद घालतो आणि नंतर तिच्यावर गोळ्या झाडून शांतपणे दुकानाच्या बाहेर निघून जातो. अतिशय जवळून गोळ्या झाडल्यामुळे महिलेचा अतिरक्तस्त्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महिलेचा पतीबरोबर वाद होता

मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव अनामिका बिश्नोई असे आहे. ती गेल्या काही वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत असल्याची माहिती मिळत आहे. अनामिका बिश्नोई यांचे इन्स्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स होते. अनामिका या राजस्थानी गाण्यांवरचे अनेक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकत असत. राजस्थानी वेशातले त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

“आमदार गणपत गायकवाड यांनी रचलेलं षडयंत्र…”, रुग्णालयातून बाहेर येताच महेश गायकवाड म्हणाले…

अनामिका बिश्नोई यांच्या पतीचे नाव महिराम असल्याचे कळते. गोळीबाराची घटना रविवारी (दि. २५ फेब्रुवारी) घडली. अनामिका त्यावेळी आपल्या दुकानात बसल्या होत्या. राजस्थानच्या फलोडी येथे त्या वूमन कलेक्शन सेंटर चालवितात.

वादावादीनंतर गोळीबार

व्हायरल झालेल्या दुकानातील सीसीटीव्ही चित्रणानुसार, महिराम दुपारी दुकानात येतो, तेव्हा त्यांच्यात वादावादी होत असल्याचे दिसत आहे. काऊंटरच्या आत एका खूर्चीवर अनामिका बसलेल्या दिसत आहेत. तर काऊंटरसमोर उभ्या असलेल्या महिरामशी त्यांची शाब्दिक चकमक सुरू असते. अचानक महिराम पिस्तूल काढून अतिशय जवळून अनामिका यांच्यावर गोळी झाडतो आणि तिथून निघून जातो.

पहिली गोळी झाडल्यानंतर महिरामची पिस्तूल जाम होते. तो दुसरी गोळी मारायचा प्रयत्न करतो, पण ते शक्य होत नाही. पहिली गोळी गळ्याजवळ लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन अनामिका यांचा मृत्यू झाला.

राजस्थान तक या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, अनामिका आणि महिराम यांचा १३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पहिले १० वर्ष चांगले गेले. मात्र त्यानंतर त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. दोघांचा वाद विकोपाला जाऊन पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. अनामिका यांनी महिरामपासून घटस्फोटही मागितला होता. या कारणावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते.