देशभरात आज मोठ्याप्रमाणावर होळीचा सण साजरा केला जातो. या निमित्त जागोजागी होलिका दहन केले जाते, यासाठी मोठ्याप्रमाणावर लाकडं पेटवली जातात. यासाठी वृक्षतोड मोठ्याप्रमाणात केले जाते, त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि आपला सण देखील पारंपारिक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनतेला ट्वीटद्वारे एक संदेश दिला आहे.
होळी साजरी करण्यासाठी झाडे तोडून लाकूड वापरण्याऐवजी लोकांनी शेणाच्या गोवऱ्या वापरून ‘होलिका दहन’ करावे. यामुळे पर्यावरण संवर्धनात मदत होईल. असं शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीटद्वारे आवाहन केलं आहे.
पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर जंगलांमधून कापली जाणारी झाडं वाचवायला हवीत. यामुळे होलिका दहनासाठी लाकडाचा वापर करून नये, शेणाऱ्या गोवऱ्या वापराव्यात. यामुळे वातावरणातील नकारात्मकता संपुष्टात येते. असं देखील सांगितलं गेलं आहे.