रेल्वेमंत्री सुरेभ प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या एका कोटीमुळे गुरुवारी संपूर्ण सभागृहात खसखस पिकली. सत्ताधाऱयांसह विरोधकांनीही प्रभू यांच्या या कोटीला मनापासून दाद दिली. स्वतःच्या आडनावाचा खुबीने वापर करून केलेल्या या कोटीमुळे कोणालाच स्वतःचे हसू आवरणे शक्य झाले नाही.
‘रेल्वेत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याला आमचे प्राधान्य असताना मलाच प्रश्न पडतो, हे प्रभू कसं काय हे साध्य होणार?’ असा प्रश्न प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पाच्या भाषणात विचारला. आपले दोन्ही हात उंचावून त्यांनी हे वाक्य उचारले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकदम खसखस पिकली. सर्वांनीच हसून आणि बाके वाजवून प्रभू यांच्या या कोटीला उत्स्फूर्त दाद दिली. हास्यधारा थांबल्यावर प्रभू यांनी मिश्किलपणे हसत पुन्हा आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात केली.

Story img Loader