तालिबान व अन्य दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी अफगाणिस्तानात तैनात करण्यात आलेल्या सैन्यात पुन्हा एकदा दाखल झालेले ब्रिटनचे राजपुत्र हॅरी यांना तालिबानकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने उपग्रह वाहिनीवरून ही धमकी दिली. अफगाणिस्तानमध्ये तैनात करण्यात आलेल्या अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्यात २००८ मध्ये हॅरी प्रथम सहभागी झाले होते, मात्र त्यावेळी ते मध्येच मायदेशी परतले होते. वैमानिक व कॅप्टनपदावर असणारे हॅरी आता नव्याने या सैन्यात दाखल झाले असून त्यांच्यावर अॅपेक हेलिकॉप्टर चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतिशय अत्याधुनिक असणारी ही हेलिकॉप्टर शत्रूवर अगदी जवळून व झपाटय़ाने हल्ला करून परतू शकत असल्याने ती तालिबानसाठी डोकेदुखीची ठरली आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने याच मुद्दय़ावर बोट ठेवले. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून लढणारा प्रत्येक जण आमचा शत्रू आहे, त्यातही हॅरी हे आमचे प्रमुख लक्ष्य असतील. अॅपेक हेलिकॉप्टरमुळे ते आमचा अधिक विध्वंस करू शकतात, त्यामुळेच त्यांना अटक करणे अथवा ते शक्य न झाल्यास ठार मारणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा