International Yoga Day  आज शुक्रवारी (२१ जून) जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. योग दिनानिमित्त क्लायमेट अॅक्शन ही थीम आहे. भारतातील अनेक राज्यांत पहाटेपासूनच योग शिबिरांना सुरुवात झाली असून आबालवृद्ध यात सहभागी झाले. योगविषयक जागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांचीमध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि योग गुरू रामदेव बाबा यांनी नांदेडमध्ये योगासनं केली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी भारतीय जनतेला योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री, आधिकारी सेलिब्रेटी यांच्यासह जगभरातून योगसाधना करत पाचवा योद दिवसा उत्सहात साजरा केला.

राजनाथ सिंह, अमित शाह, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, पियूष गोयल, रवी शंकर प्रसाद, जयंत सिन्हा आणि प्रकाश जावडेकर यांनी योगासनं करत पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. विविध आजारांमुळे गरिबांना त्रासाला सामोरं जावं लागते. देशामध्ये एकीकडे गरिबी कमी होत असताना त्यांच्यासाठी योगाचे माध्यम पोहोचायला पाहिजे. गरिबांपर्यंत योगा पोहोचल्याने ते आजारांपासून वाचू शकतील. यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

भारतीय जवानांनीही योग दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. कोणी आयएनएस युद्ध नौकेवर तर कोणी हिमालयातील बर्फाच्या डोंगरामध्ये योग करुन योग दिन साजरा केला. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(BSF) च्या डॉग स्कॉड पथकातील कुत्र्यांनी प्रशिक्षकांसोबत योगा केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. भारतीय जवानांनी उणे २० डिग्री तापमानात तसेच नदीमध्ये आणि नक्शली भागात योगासने केली.

Live Blog

10:42 (IST)21 Jun 2019
डॉग स्कॉडचा जबरदस्त योग
10:42 (IST)21 Jun 2019
डॉग स्कॉडचा जबरदस्त योगा
09:59 (IST)21 Jun 2019
केंद्रीय मंत्र्यांनी केली योगासनं

राजनाथ सिंह, अमित शाह, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, पियूष गोयल, रवी शंकर प्रसाद, जयंत सिन्हा आणि प्रकाश जावडेकर यांनी योग करत पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. 

09:40 (IST)21 Jun 2019
स्वच्छता, निसर्ग आणि आरोग्यदायी भविष्यासाठी योगासनं उपयोगी - सय्यद अकबरूद्दीन

न्यूयार्क - संयुक्त राष्ट्राच्या सभागृहात पहिल्यांदाच योग दिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे स्वच्छता, निसर्ग आणि आरोग्यदायी भविष्यासाठी ही योगासनं उपयोगी ठरणार आहेत.  - सय्यद अकबरूद्दीन, भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूत


09:33 (IST)21 Jun 2019
योग रंगात न्हाऊन निघाली संयुक्त राष्ट्राची इमारत

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाची इमारत योग रंगात न्हाऊन निघाली आहे. आज जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. त्या धर्तीवर संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर सूर्य नमस्काराची योगासन मुद्राच्या फोटो झळकला आहे.

08:57 (IST)21 Jun 2019
International Yoga Day : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सांगितलं योगासनांचं महत्त्व!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या योगासन शिबीरात हजेरी लावली. योगासनं करणं किती महत्त्वाचं असतं हे शिल्पा शेट्टीने उपस्थितांना सांगितलं... वाचा सविस्तर

08:53 (IST)21 Jun 2019
गडकरी यांनी नागपूरात केली यागोसनं

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केली योगासनं

08:52 (IST)21 Jun 2019
राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली योगासने

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली येथे राजपथवर केली योगासने

08:51 (IST)21 Jun 2019
योग दिन हा फक्त उपक्रम नाही - राष्ट्रपती

योग दिन हा फक्त एक उपक्रम नाही. योगाला आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवण्याचा एक मार्ग आहे- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

08:24 (IST)21 Jun 2019
योगविद्येचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला हवा – माता अमृतानंदमयी

योग्य प्रशिक्षणाद्वारे आणि शरीर, मन व बुद्धी यांच्या एकात्मिकरणाद्वारे अंतर्गत क्षमता जाणून घेण्याचे साधन म्हणजे योग. योगमुळे आपल्याला दैनंदिन जीवनातही अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होते.. वाचा सविस्तर

08:10 (IST)21 Jun 2019
International Day of Yoga 2019 : प्रत्येक सूर्यनमस्कारात दहा योगासने, जाणून घ्या फायदे

International Yoga Day : लहान वयापासूनच आपल्यापैकी अनेकांना सूर्यनमस्कारांची ओळख होते. दहा योगासने एकदम करवून घेणाऱ्या या व्यायाम प्रकाराचे व्यायामासाठी अनेक फायदे आहेत. मात्र हे फायदे मिळण्यासाठी ते योग्य प्रकारे व नियमितपणे घालायला हवेत. वाचा सविस्तर

08:09 (IST)21 Jun 2019
International Yoga Day 2019 : योगा शिकताना या चुका टाळाच

International Yoga Day  : शरीर आणि मन दोहोंचे स्वास्थ्य राखण्यासाठी योगा निश्चितच उत्तम व्यायामप्रकार आहे. उत्तम योगसिद्धी प्राप्त करायची असेल तर, सातत्य, सामर्थ्य आणि संयम असणे आवश्यक असते. सुरूवातीच्या काळात योगा शिकताना घाई किंवा काही अन्य कारणांमुळे मोठ्या चुका होण्याची शक्यता असते. या चुकांचे परिणाम गंभीर सुद्धा असू शकतात. जाणून घेऊया योगा करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे. वाचा सविस्तर

08:08 (IST)21 Jun 2019
ऑफिसच्या डेस्कवरही सहज करता येतील अशी योगासने

२१ जून निमित्त असणाऱ्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आम्ही असे काही व्यायामप्रकारांबद्दल सांगणार आहोत जे ऑफीसमध्ये खुर्चीत बसल्या बसल्याही सहज करता येईल आणि तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. वाचा सविस्तर

08:04 (IST)21 Jun 2019

पुणे - जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेच्या वतीने गणेश कला क्रिडा रंगमंच येथील कार्यक्रमास 500 विद्यार्थी सहभागी झाले. महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि महापालिका सहायक आयुक्त (क्रिडा) किशोरी शिंदे सहभागी

08:01 (IST)21 Jun 2019
सुदर्शन पटनायक यांचे खास वाळू शिल्प

सुदर्शन पटनायक यांनी योग दिवसाचे औचित्य साधत वाळू शिल्प काढले आहे. यामध्ये त्यांनी विविध प्रकारची योगासनं रेखाटली आहे.

07:57 (IST)21 Jun 2019
लोकसभा अध्यक्षांनी केली योगासनं

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेतील कर्मचाऱ्यांसोबत केली योगासनं

07:53 (IST)21 Jun 2019
इचलकरंजी येथे तीन हजार विद्यार्थ्यांनी केली योगासनं

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शिप्र मंडळी, आयसीएआयच्या वतीने इचलकरंजी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तब्बल 3 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. 

07:50 (IST)21 Jun 2019
नाशिकमध्ये पोलिसांची योगासनं

आंतरराष्ट्रीय योद दिनानिमित्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह नाशिक पोलिसांनी केला हास्ययोगा

07:41 (IST)21 Jun 2019
योगामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल - मोदी

विविध आजारांमुळे गरिबांना त्रासाला सामोरं जावं लागते. देशामध्ये एकीकडे गरिबी कमी होत असताना त्यांच्यासाठी योगाचे माध्यम पोहोचायला पाहिजे. गरिबांपर्यंत योगा पोहोचल्याने ते आजारांपासून वाचू शकतील. यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

07:34 (IST)21 Jun 2019
आयएनएस विराटवर जवानांची योगासनं

मुंबई डॉकयार्डवर असलेल्या आयएनएस विराटवर जवानांनी योगासनं केली.

07:32 (IST)21 Jun 2019
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची गेट वे ऑफ इंडियाजवळ योगासनं
07:29 (IST)21 Jun 2019
रामदेव बाबांसह मुख्यमंत्र्यांची योगसनं

योग गुरू रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केली योगसाधना

07:28 (IST)21 Jun 2019
नदी उभे राहून योगासनं

अरुणाचल प्रदेशमध्ये इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसांच्या नवव्या बटालीयनने नदीत उभं राहून केली योगासनं

07:26 (IST)21 Jun 2019
आजारमुक्त होण्यामध्ये योगाचे मोठे योगदान - मोदी

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी योगाचे महत्व सांगितले. आजारमुक्त होण्यामध्ये योगाचे मोठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

07:24 (IST)21 Jun 2019
योग सगळ्या जगाने स्वीकारला याचा मला अभिमान-मुख्यमंत्री

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह योगासनं केली. नांदेडमध्येही योग दिवस साजरा झाला. सगळ्या जगाने योग स्वीकारला याचा मला अभिमान वाटतो आणि हे शक्य झालं ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. वाचा सविस्तर

07:22 (IST)21 Jun 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजारो लोकांसोबत योगसाधना!

आज संपूर्ण जगात भारतासह पाचवा योग दिवस साजरा करण्यात येतो आहे.  रांची येथील प्रभात तारा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी योगासनं करणार असल्याने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  सविस्तर वाचा

07:19 (IST)21 Jun 2019
योग आदिवासींच्या आयुष्याचा भाग व्हावा - मोदी

योग सर्वांसाठी आहे, आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून योगाकडे पाहा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी रांची येथे केले. योग आदिवासींच्या आयुष्याचा भाग व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

07:16 (IST)21 Jun 2019
जवानांची १४ हजार फूट उंचावर १० अंश सेल्सियस तापमानात योगासनं

इंडो-तिबेटीयन बॉर्डरच्या जवानांनी रोहतांग येथे १९ हजार फूट उंचावर - १५ अंश सेल्सियस तापमानात योगासनं करत योग दिवस साजरा केला.Sikkim: ITBP personnel perform yoga at an altitude of 19000 ft near OP Dorjila at minus 15 degrees Celsius temperature on #InternationalDayofYoga pic.twitter.com/QAdfZQRa9A— ANI (@ANI) June 21, 2019

07:14 (IST)21 Jun 2019
योग करण्याची आपल्या देशाची प्राचीन परंपरा - मोदी

आज संपूर्ण जगात भारतासह पाचवा योग दिवस साजरा करण्यात येतो आहे. योग करण्याची आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची ही परंपरा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. आधुनिक योग आपल्याला सर्व स्तरात पोहचवायचा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

07:13 (IST)21 Jun 2019
मुख्यमंत्री आणि योगगुरू रामदेव बाबानींही नांदेडमध्ये केली योगासनं

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगगुरू रामदेव बाबा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा योग शिबिरात भाग

07:12 (IST)21 Jun 2019
पावसांमध्ये ४० हजार जणांसोबत मोंदीनी केली योगासनं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथील मैदानात सुमारे ४० हजार लोकांसोबत योगासनं केली.  रांची येथील प्रभात तारा मैदानावर योग शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. योगासनं सुरू करताना पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र मोदींसह ४० हजार जणांनी पावसांमध्येही योगासनं केली. 

07:10 (IST)21 Jun 2019
मोदींकडून योग दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या देशवासीयांना शुभेच्छा