आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात श्लोक म्हणणे सक्तीचे नाही, मुस्लिमांनी अल्लाहचे नाव घ्यावे, असे स्पष्ट करून सरकारने मुस्लिमांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन गुरुवारी केले. वाद टाळण्यासाठी योगाभ्यास कार्यक्रमातून सूर्यनमस्कार वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यापाठोपाठ आता हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राजपथावर २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये मुस्लिमांनी सहभागी व्हावे आणि त्यांनी श्लोक म्हणण्याऐवजी अल्लाहचे नाव घ्यावे, असे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.

Story img Loader