International Day of Yoga 2024 : येत्या १० दिवसांत देशात जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जागतिकय योग दिनाची सुरुवात केली होती. त्यानिमित्ताने यंदा १० वा जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. या योग दिनानिमित्ताने देशभर योग उपक्रमांची जनजागृती झाली. अनेकांनी योग करण्यास सुरुवात करून आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. आता यंदाच्या योग दिनाला अवघे १० दिवस उरलेले असताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी यासंदर्भातील एक्सवर पोस्ट केली आहे.

X पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “आतापासून दहा दिवसांनी जग दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करेल.यामुळे एकता आणि सुसंवाद साजरा होईल. योगाने सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत आणि जगभरातील लाखो लोकांना सर्वांगीण कल्याणासाठी एकत्र केले आहे.”

sun shani and shukra grah yuti
पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी मिळणार; ३० वर्षानंतर सूर्य, शनी आणि शुक्र निर्माण करणार ‘त्रिग्रही योग’; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Daily Horoscope 12 January 2025 In Marathi
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
Dhanu Rashi Bhavishya 2025 in Marathi
Sagittarius Yearly Horoscope 2025 : धनु राशीच्या आयुष्याचे होणार सोने! आर्थिक लाभ, मोठे प्रकल्प तर रखडलेली कामे होतील पूर्ण; सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार

“जसे आपण या वर्षीच्या योग दिनाजवळ येत आहोत, योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणे आवश्यक आहे आणि इतरांनाही त्याचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. योग हे शांततेचे अभयारण्य आहे. जे आपल्याला जीवनातील आव्हानांविरोधात शांततेने आणि धैर्याने लढण्यास सक्षम करते”, असंही मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आवाहनच केलं नाही तर त्यांच्या डिजिटल रुपातील योग प्रशिक्षकाचे काही व्हिडिओही प्रदर्शित केले आहेत. या व्हिडिओमध्ये योगाचे विविध प्रकार मोदींच्या डिजिटल रुपातील प्रशिक्षकाने शिकवले आहेत.

योगाचे फायदे –

  • लवचिकता

योग तुमची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमच्या शाररीक वेदना कमी होण्यास आणि एकूण गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.

  • मजबूत स्नायू –

योगामुळे तुमचे स्नायू बळकट होण्यास मदत होते, तुमच्या मुख्य स्नायूंसह, ज्यामुळे तुमची मुद्रा आणि संतुलन सुधारू शकते.

  • तणाव कमी होतो –

योगामुळे मन आणि शरीर शांत होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.

  • झोप सुधारते –

योगामुळे शरीर आणि मन शांत होऊन शांत झोप घेता येऊ शकते.

  • ऊर्जा वाढते-

योगासने रक्ताभिसरण सुधारून आणि थकवा कमी करून ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करू शकतात.

  • वजन कमी होणे –

योग कॅलरी बर्न करते आणि चयापचय सुधारधे ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

  • मानसिक संतुलन सुधारते –

योगामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

आंतरराष्ट्रीय योग दिन कसा साजरा करायचा?

आंतरराष्ट्रीय योग दिन हा दिवस योगाबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचे अनेक फायदे अनुभवण्यासाठी साजरा केला जातो. तुम्हाला जर योग करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही एखादा योगा क्लास शोधू शकता शिवाय ऑनलाइन किंवा पुस्तकातूनही योग शिकू शकता. यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन कसा साजरा करू शकतो याबद्दलचे काही पर्याय खाली दिले आहेत.

Story img Loader