भारतात उगम पावलेल्या योगविज्ञानाची गाथा ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’निमित्ताने रविवारी जगभरामध्ये उलगडली आणि सर्वच खंडांमधील नागरिक आसनमग्न झाले. देशभरातही सर्वच राज्ये सकाळपासून योगमय झाली. योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेकडो शाळकरी मुलांसमवेत आणि हजारो साधकांच्या साक्षीने राजपथावर योगसाधना केली. मोदी यांनी राजपथावर वज्रासन व पद्मासने करून स्वतच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा परिचय दिला. सुमारे दोन तास चाललेल्या योग अभ्यासात २१ योगमुद्रांचा सराव करण्यात आला. राजपथावरील या भव्य योग सोहळ्याचे दोन विक्रम गिनेस बुकमध्ये नोंदविण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका या प्रमुख राष्ट्रांसमवेत आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांमध्ये उत्स्फूर्तपणे योगदिवस साजरा करण्यात आला.
भारताकडून १५२ परदेशी दूतांना बोलावण्यात आले होते. जगभरात १९१ देशांतील २५१ शहरात योग दिन साजरा करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा