संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाची इमारत योग रंगात न्हाऊन निघाली आहे. आज जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. त्या धर्तीवर संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर सूर्य नमस्काराची योगासन मुद्राच्या फोटो झळकला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या इमारातीच्या उत्तर दिशेला असलेल्या दरवाजावर हा फोटो झळकला आहे. भारताच्या स्थायी मिशनने पाचवा योग दिन उत्सवात साजरा केला. योग दिवसाचे औचित्य साधत संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. यामध्ये अनेक आधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूत सय्यद अकबरूद्दीन यांच्यासह अनेक आधिकाऱ्यांनी भाग घेतला.
२१ आणि २२ जून असे दोन दिवस संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयांमध्ये योग दिवस साजरा केला जाणार आहे. यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रावारी २१ जून रोजी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये ‘जलवायूच्या संरक्षणासाठी योगाचे महत्व’ या विषयावर चर्चा आयोजित केली आहे.
Join us LIVE for the 5th annual International #YogaDay2019 celebration at @UN with Gurus.
This year’s theme is “Yoga for #ClimateAction.” https://t.co/yKDIdH4nKo— UN Web TV (@UNWebTV) June 20, 2019
२१ जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघानं घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता.