आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
झांगर (नौशेरा)- इस्लामिक स्टेट (आयएस) ही दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी केला. आम्हाला जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार आयएसने या भागात फार मोठा शिरकाव केला नसला, तरी ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे १६ कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
पीर पांचाल पर्वतराजीपलीकडून भारतात घुसखोरी करण्यासाठी २०० ते २२५ अतिरेकी तयार आहेत. सीमेपलीकडील दहशतवाद्यांचे जाळे अद्याप कायम असून, त्यांची प्रशिक्षण शिबिरेही अजून सक्रिय आहेत, असेही सिंग यांनी सांगितले.
First published on: 04-07-2015 at 03:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intrusion attempts islamic state in pok