‘जवाहरलाल दर्डा यवतमाळ एनर्जी लि.’ ला वाटप करण्यात आलेल्या कोळसा खाणीप्रकरणी गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) देवेन्द्र दर्डा यांची मंगळवारी पुन्हा चार तास चौकशी केली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांचे देवेन्द्र हे पुत्र आहेत.
सीबीआयने देवेन्द्र यांच्यासह त्यांचे चुलत बंधू ऋषी यांची सोमवारीही चौकशी केली होती. महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र दर्डा यांचे ऋषी हे पुत्र आहेत. देवेन्द्र हे संबंधित कंपनीचे संचालक असून या प्रकरणी ते आरोपी आहेत. यासंदर्भात विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. ही कंपनी आणि लोकमत समूह यांच्यात काय संबंध आहेत, हे जाणण्यासाठी देवेन्द्र यांना बोलावण्यात आले असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
छत्तीसगढ येथील कोळशाचे साठे मिळावेत म्हणून देवेन्द्र यांनी आपले वडील विजय दर्डा यांना कशा प्रकारे सहाय्य केले, याबद्दलही विचारणा करण्यात आली. ‘जवाहरलाल दर्डा यवतमाळ एनर्जी लि.’ कंपनीत झालेल्या गैरव्यवहारांप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या सकृतदर्शी आरोपपत्रात देवेन्द्र यांच्याखेरीज विजय दर्डा, माजी विद्यमान संचालक राजेन्द्र, मनोज जयस्वाल, आनंद व अभिषेक जयस्वाल यांची नावे आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा