बोस्टनमध्ये बोइंग ७४७ ड्रीमलायनर विमानाच्या बॅटरीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे संकेत मिळत आहेत, असे अमेरिकेच्या तपास पथकातील तज्ज्ञांनी सांगितले. विमानात आग लागल्याच्या घटनेनंतर एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी ड्रीमलायनरची उड्डाणे थांबविली आहेत. सध्या विमानाच्या बॅटरीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाच्या अध्यक्षा डेबोरा हर्समन यांनी सांगितले. लिथियमची बॅटरी असल्याने त्यामध्ये शॉर्टसर्किट झाले असून तपासाअंती असे प्रकार का घडतात, याचा निष्कर्ष काढता येईल, असेही हर्समन म्हणाल्या.

Story img Loader