सहारा ग्रुपचे अध्यक्ष सुब्रतो रॉय आणि सहाराच्या इतर तीन अधिका-यांना तीन कोटी गुंतवणुकदारांच्या २४ हजार कोटी रुपयांच्या गुंतणूक परतफेड प्रकरणी सेबीसमोर उपस्थित रहावे लागले. सुब्रतो यांच्यासोबत सहाराचे संचालकमंडळ अशोक रॉय चौधरी, रवी शंकर दुबे आणि वंदना भार्गव यांनाही सेबीसमोर व्यक्तीश: हजर रहावे लागले. सेबीने सहाराच्या दोन कंपन्यांच्या या चार संचालकांना २६ मार्च रोजी आपली मालमत्ता, गुंतवणुक आणि कंपनीची मालमत्ता, गुंतणुकदारांना करण्यात आलेली परतफेड यासंपूर्ण माहितीची चौकशी करण्याबाबत सेबीच्या मुख्यकार्यालयात उपस्थित राहण्याचा समन्स धाडला होता.    
त्यानुसार आज सेबीमार्फत झालेल्या चौकशीत सहाराच्या ‘सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन’ आणि ‘सहारा हाऊसिंग इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’ या दोन कंपन्यांच्या मुख्यनावाखाली करण्यात आलेल्या कारभाराबद्दलचे प्रश्न संचालकांना विचारण्यात आले. तर सर्वोच्च न्यायालयाने याआधी सहाराच्या या दोन कंपन्यांच्या तीन कोटी गुंतवणुकदारांचे २४००० कोटी रुपयांची परतफेड तीन महिन्यात करण्यास सांगितले आहे.

Story img Loader