Stock Market Today: अमेरिकेच्या फेडच्या धोरणाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला आहे. सलग दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल ६.५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. शेअर बाजाराचा निफ्टी २६८ अंकांनी घसरून १७ हजार ४९१ वर पोहोचला आहे. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८७२ अंकांच्या पडझडीनंतर ५८ हजार ७७४ वर स्थिरावला आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर खरेदीनंतरही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दोन दिवसात १७०० अंकांनी घसरला आहे.

Share Market Tips: शेअर मार्केटमध्ये नवीन आहात? गुंतवणूक करण्याआधी कंपनीचे असे करा परीक्षण

महागाई दर दोन टक्क्यांपर्यंत नियंत्रिण ठेवण्यासाठी अमेरिकेतील आर्थिक धोरणांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये झालेल्या पडझडीनंतर दलाल स्ट्रीटचे ट्रेडर्स चिंतेत आहेत. येत्या सप्टेंबरपर्यंत अमेरिकेतील व्याजदरांमध्ये ७५ अंकाची वाढ होण्याची शक्यता यूएस फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या वृत्तानंतर अमेरिकी डॉलरचा निर्देशांक वधारून १०८.४ अंकांवर पोहोचला आहे. ११ ऑगस्टला हा निर्देशांक १०५.०९ होता.

बँकांच्या तपासणीतच आढळल्या दोन हजारांच्या हजारो बनावट नोटा

दरम्यान, भारतीय शेअर बाजारामधील बीएसई बँक, वित्त, आरोग्य सेवा, औद्योगिक, आयटी, ऑटो, कॅपिटल गुड्स, धातू आणि रिएल्टी या क्षेत्रातील निर्देशांक १ ते २.७ टक्क्यांच्या दरम्यान घसरले आहेत. मुंबई शेअर बाजारातील १४६ शेअर्सनी सोमवारी ५२ आठवड्यांमधील सर्वोच्च दर गाठला आहे. तर ४६ शेअर्सची पडझड झाली आहे. अदानी पॉवर, एस्ट्रा मायक्रोव्हेव्ह, फोर्ब्स अँड कंपनी, ग्रींडवेल नोर्टन, आयटीसी, केसीबी फिनोलेक्स मील्स, प्रिकोल, टोरंट पॉवर या शेअर्सने ५२ आठवड्यांमधील सर्वोच्च दर गाठला.

Story img Loader