अ‍ॅपल या कंपनीच्या वतीने येत्या २३ ऑक्टोबरला बहुचर्चित व अत्याधुनिक ‘आयपॅड मिनी’ सादर केला जाणार असल्याचे समजते. अ‍ॅपल टाउन हॉलच्या ऑडिटोरियम मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात तो सादर केला जाणार असून त्यात खास निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आयफोन फोर एस, मॅक बुक एअर व ओएस एक्स लायन ही उत्पादनेही पहिल्यांदा येथेच जाहीरपणे सादर करण्यात आली होती.
अ‍ॅपल आता छोटा, कमी खर्चातील लोकप्रिय आयपॅड तयार करीत असून तोच आयपॅड मिनी नावाने सादर केला जात आहे. सॅमसंगचा नोट व इतर स्वस्त साधनांचा मुकाबला करण्यासाठी अ‍ॅपल कंपनी आयपॅड मिनी सादर करीत आहेत. स्मार्ट फोन व मोठे टॅबलेट यांच्याशिवाय मधला ग्राहक वर्ग पकडण्यासाठीही अ‍ॅपलला त्याचा उपयोग होत आहे.
अ‍ॅपलच्या प्रवक्तयांनी मात्र या वृत्तास दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्टचा सरफेस टॅबलेट २६ ऑक्टोबरला सादर केला जाणार आहे व त्याला ‘विंडोज ८’ सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. आयपॅड मिनीचा पडदा ७.८५ इंचाचा असून त्यात ‘आयफोन ५’ सारखे लायटनिंग कनेक्टर बसवण्यात आले असून तो सडपातळ असणार आहे.

Story img Loader