Section 377 Supreme Court Verdict: परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट आज (गुरुवारी) निकाल दिला. समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

समलैंगिकांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसह इतरांनी केलेल्या याचिकांची सुनावणी केल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने गेल्या १७ ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. युक्तिवादादरम्यान केंद्र सरकारने दोन प्रौढांनी परस्परसंमतीने केलेल्या अनैसर्गिक संभोगाला गुन्हा ठरवण्याशी संबंधित दंडात्मक तरतुदींच्या घटनात्मक वैधतेचा मुद्दा न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीवर सोडला होता. अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदींचे इतर पैलू कायद्यात तसेच कायम राहू दिले जावेत, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती.

congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
cultural and educational rights under indian constitution article 29 and 30
संविधानभान : भाषेचा मायाळू विसावा
Supreme Court On NCP :
Supreme Court : “स्वत:च्या पायावर उभे राहा”, शरद पवारांचे फोटो न वापरण्याची अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची ताकीद
article 344 commission and committee of parliament on official language
संविधानभान : भाषिक संतुलनाचा विचार
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

गुरुवारी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने या याचिकेवर निकाल दिला.

Live Blog

12:38 (IST)06 Sep 2018
एलजीबीटी समुहाची समाजाने माफी मागितली पाहिजे: न्या. मल्होत्रा

एलजीबीटी समुहातील लोकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची समाजाने माफी मागितली पाहिजे. इतक्या वर्षांपासून त्यांचे हक्क डावलण्यात आले: न्या. इंदू मल्होत्रा

12:36 (IST)06 Sep 2018
VIDEO: पंचतारांकित हॉटेलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे अशा पद्धतीने स्वागत

दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे अशा पद्धतीने स्वागत करण्यात आले.

12:28 (IST)06 Sep 2018
सरकारला खासगी गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही: सुप्रीम कोर्ट

दोन सज्ञान व्यक्तींमधील खासगी गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. कोणासोबत राहावे आणि कोणासोबत लैंगिक संबंध ठेवावे हा त्या व्यक्तीचा निर्णय आहे. एलजीबीटी समाजाला कायद्याचे सुरक्षा कवच दिले पाहिजे. त्यांना शिक्षा द्यायला नको: सुप्रीम कोर्ट

12:24 (IST)06 Sep 2018
मुंबईत जल्लोष

मुंबईत जल्लोष

12:21 (IST)06 Sep 2018
निकालानंतर मुंबईतही आनंदोत्सव

निकालानंतर मुंबईतही आनंदोत्सव, अखेर न्याय मिळाल्याची भावना

12:19 (IST)06 Sep 2018
निकालानंतर आनंदाश्रू

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चेन्नई जल्लोष, निकाल ऐकून अनेकांना अश्रू अनावर

12:17 (IST)06 Sep 2018
केंद्र सरकारने निर्णयाचा प्रसार व प्रचार करावा: सुप्रीम कोर्ट

समलैंगिकांनाही अन्य नागरिकांप्रमाणेच समान अधिकार असून केंद्र सरकारने समलैंगिकाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या कायद्याचा प्रचार व प्रसार समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत केंद्र सरकारने करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

12:14 (IST)06 Sep 2018
मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता: सुप्रीम कोर्ट

एलजीबीटी समुहाला सेकंड क्लास नागरिकांचा दर्जा दिला जातो. पण आता या समाजालाही देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे: न्या. चंद्रचूड

12:06 (IST)06 Sep 2018
समलैंगिकता हा मानसिक आजार नाही: न्या. आर एफ नरिमन

समलैंगिकता हा मानसिक आजार नसून संसदेलाही याची कल्पना आहे: न्या. नरिमन

11:55 (IST)06 Sep 2018
संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

कलम ३७७ मुळे संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते. दोन सज्ञान व्यक्तींमध्ये संमतीने ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे. त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही: सुप्रीम कोर्ट

11:49 (IST)06 Sep 2018
प्रत्येकाला स्वतंत्र ओळख-सुप्रीम कोर्ट
11:45 (IST)06 Sep 2018
सुनावणीला सुरूवात

देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार-सुप्रीम कोर्ट

11:45 (IST)06 Sep 2018
देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार

देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार असून आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

11:45 (IST)06 Sep 2018
सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय निकालात

#Section377 in Supreme Court: Sustenance of identity is the pyramid of life, observes Chief Justice of India Dipak Misra— ANI (@ANI) September 6, 2018

11:44 (IST)06 Sep 2018
देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार-सुप्रीम कोर्ट
11:41 (IST)06 Sep 2018
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात

कलम ३७७ वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे

11:22 (IST)06 Sep 2018
सुप्रीम कोर्टाबाहेर गर्दी

समलैंगिकांसाठी काम करणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची सुप्रीम कोर्टाबाहेर गर्दी, सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा

11:19 (IST)06 Sep 2018
जानेवारीमध्ये फेरविचार याचिका

२०१३ मधील निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात नाझ फाऊंडेशन व अन्य समाजसेवी संघटनांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. शेवटी जानेवारी २०१८ मध्ये न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने निर्णयाचा फेरविचार करण्याचा निर्णय दिला.

11:18 (IST)06 Sep 2018
खासगीपणाचा अधिकार आणि कलम ३७७

सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट २०१७ मध्ये खासगीपणाच्या अधिकारासंदर्भात निर्णय दिला होता. यात खासगीपणाचा अधिकार आणि लैंगिक प्राधान्यक्रमांचे रक्षण करणे हे राज्यघटनेच्या कलम १४, १५ आणि २१ नुसार नागरिकांना बहाल करण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांच्या मूळाशी असलेले महत्त्वाचे तत्त्व आहे, असे कोर्टाने म्हटले होते.

10:13 (IST)06 Sep 2018
गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय?

पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.

09:56 (IST)06 Sep 2018
नाझ फाऊंडेशनची याचिका

या कलमाविरोधात सर्वप्रथम नाझ फाऊंडेशन या संस्थेने कोर्टात याचिका दाखल केली. २००१ मध्ये संस्थेने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली.

09:33 (IST)06 Sep 2018
थॉमस बॅबिग्टंन मॅकोले यांनी तयार केलेले कलम

‘ईस्ट इंडिया कंपनी’चा अधिकारी थॉमस बॅबिग्टंन मॅकोले याने भारतीय संहितेत ‘कलम ३७७’ घालण्याचे ठरवले. एखाद्यानं ‘निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन केलेली कोणतीही कृती’ केल्यास त्याला जन्मठेप किंवा दहा वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली.

09:22 (IST)06 Sep 2018
१५८ वर्षांपासूनचे जुने कलम

जवळपास १५८ वर्षांपासूनचे जुने कलम रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुनावणी सुरु होती.

यापूर्वी कलम ३७७ मध्ये ‘अनैसर्गिक गुन्ह्य़ांचा’ होता. निसर्गनियमाच्या विरोधात जो कुणी कुठलाही पुरुष, स्त्री किंवा प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोग करेल, त्याला जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंतची कैद अशा शिक्षेची आणि दंडाची तरतूद होती.