जागतिक तापमान वाढीबाबत आयपीसीसीनं (Inter-governmental Panel on Climate Change ) ने धोक्याची सूचना दिली आहे. २१०० सालापर्यंत पृथ्वीच्या तापमानात २ डिग्री सेल्सियसने वाढ होईल असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच पुढच्या ७९ वर्षात हा बदल होणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर राहणं कठीण होईल असा इशारा देण्यात आला आहे. आयपीसीसीमध्ये अहवाल तयार करण्यासाठी ६० देशातील २३४ वैज्ञानिकांचा समावेश होता. आयपीसीसीनं आपल्या सहाव्या अहवालाचा पहिला भाग जाहीर केला आहे. या अहवालातील इशाऱ्यानंतर मानवी जीवनावर भविष्यात विपरीत परिणाम होतील, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. वातावरणात उष्णता निर्माण करणाऱ्या वायूंच्या सतत उत्सर्जनामुळे, तापमानाची मर्यादा अवघ्या दोन दशकांत मोडली गेली आहे, असं अहवालात म्हटलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता या शतकाच्या अखेरीस समुद्राची पातळी सुमारे दोन मीटरने वाढेल, अशी भीती अभ्यासाशी संबंधित संशोधकांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा