एएनआय, नवी दिल्ली
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अलीकडच्या काळात राजकीय वादाचा विषय ठरलेल्या ‘पेगॅसस मालवेअर’प्रमाणे एका भाडोत्री स्पायवेअरपासून सावध राहण्याचा इशारा ‘अॅपल’ने दिला आहे. भारतासह ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना ही इशारावजा सूचना देण्यात आली असून गोपनीयता व विदा सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
इस्रायली कंपनी ‘एनएसओ ग्रुप’च्या पेगॅसस या ‘स्पायवेअर’वरून गोंधळ उडाल्यानंतर ऑगस्ट २०२२मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीला २९ पैकी पाच मोबाईल फोनमध्ये मालवेअर आढळून आले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२३मध्येही अॅपलने देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘संभाव्य सरकार पुरस्कृत स्पायवेअर हल्ल्याचा’ इशारा दिला होता. आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा इशारा देण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांमधून त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
First published on: 12-04-2024 at 06:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone users in 91 countries warned to beware of pegasus like spyware amy