पुढच्यावर्षी आयपीएलचे अध्यक्षपद स्वीकारण्याची माझी इच्छा नाही, असे सांगितलेल्या राजीव शुक्ला यांनी गुरुवारी ‘सायलेंट मोड’ राहणेच पसंद केले. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी, अध्यक्षांनी राजीनामा द्यावा की नाही, याबद्दल मला जे काही सांगायचे होते, ते मी कालच (बुधवारी) सांगितले आहे. आता याबद्दल काहीही बोलायचे नाही, असे सांगत पाटणा येथील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.
मला जे काही सांगायचे होते, ते मी कालच बोललो आहे. आता नव्याने काहीही सांगायचे नाही, असे राजीव शुक्ला पत्रकारांना म्हणाले. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्री सचिन पायलट यांच्यासह शुक्ला गुरुवारी सकाळी पाटणा विमानतळावर आले. तेथून ते दोघेही महाराजगंज येथे पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले.
फिक्सिंग, बेटिंग विषयावर राजीव शुक्ला ‘सायलेंट मोड’वर
पुढच्यावर्षी आयपीएलचे अध्यक्षपद स्वीकारण्याची माझी इच्छा नाही, असे सांगितलेल्या राजीव शुक्ला यांनी गुरुवारी 'सायलेंट मोड' राहणेच पसंद केले.
First published on: 30-05-2013 at 11:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl chief shukla refuses to talk more on scandal srinivasan