स्पॉट फिक्सिंगमुळे अटक करण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या एस. श्रीशांत आणि अजित चंडिला यांना बुकींनी शारीरिक संबंधांसाठी तरुणीही पुरविल्या होत्या, अशी माहिती पोलिस तपासात उघड झालीये. या दोघांनी बुकींशी फोनवरून साधलेल्या संवादामधून पोलिसांना या कृत्याबद्दल माहिती मिळाली.
दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने गुरुवारी पहाटे मुंबईमधून श्रीशांत, चंडिला आणि अंकित चव्हाण या तिघांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक केली. पोलिसांनी ११ बुकींनाही ताब्यात घेतलंय.
बुकी आणि या तिन्ही क्रिकेटपटूंमध्ये झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. त्यावरून अशी माहिती मिळालीये की, मनान आणि चंद या दोन बुकींनी शारीरिक संबंधांसाठी श्रीशांत आणि चंडिला यांना तीन वेळा तरुणी पुरविल्या होत्या. श्रीशांत आणि चंडिला यांच्यासाठी तरुणी हॉटेलमध्ये आल्याचे आणि त्या तेथून निघाल्याचे मोबाईलवरील संवादावरून स्पष्ट झाल्याचे दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
दिल्ली पोलिसांनी श्रीशांत आणि त्याचा मित्र जिजू यांना गुरुवारी पहाटे खार परिसरातून अटक केली. त्यावेळी त्यांच्यासोबत तरुणी होती, असे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही आरजी नाईटक्लबमध्ये गेले होते आणि त्यानंतर दोघेही वेगवेगळ्या कारमध्ये तरुणीसोबत होते, असे पोलिसांनी सांगितले.
दगाबाज रे..
गैरव्यवहारांच्या पुराव्यांसह पोलिसांकडून ‘स्पॉट-फिक्सिंग’चा पर्दाफाश!
एखाद-दुसऱ्या सडक्या अंडय़ांनी खेळ नासणार नाही -श्रीनिवासन
ये तो होना ही था! 

Story img Loader