आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नईतील विक्रम अग्रवाल या हॉटेल मालकाला ३० मे च्या आत पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. फिक्सिंगप्रकरणात समोर आलेल्या ‘विक्टर’ या कोडनावाचा संशय विक्रम अग्रवाल या हॉटेल मालकावर आहे. आरोपांनुसार विक्टरने एक कोटी रुपयांची सट्टेबाजी केली होती. व्ही.व्ही.टी हॉटेल्सचे विक्रम अग्रवाल यांची ‘रादिस्सोन ब्लू’ आणि ‘फॉर्च्यून’ या दोन लक्झरी हॉटेल्समध्ये मालकी भागिदारी आहे. तसेच विक्रम अग्रवाल यांनी चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरूनाथ मयप्पन आणि अभिनेता विंदु दारा सिंग यांची ओळख घडवून आणली असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दोघांच्या चौकशी दरम्यान ‘विक्टर’ हे नाव समोर आले.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, राजस्थान रॉयल्स संघाच्या तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर चेन्नईमधील बुकींच्या टोळीतील मुख्य बुकी, उत्तम जैन हा सतत विक्टरशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तसेच विक्टरने शंभरहून अधिक फोनकॉल्स केल्याचे आढळून आले आहे. हा मोबाईल नंबर अग्रवाल यांच्या पत्नीच्या नावाने नोंदणीकृत आहे. त्यामुळे विक्रम अग्रवाल यांच्याविरुद्धचा पोलिसांचा संशय आणखी बळावला व त्याला ३० मे च्या आत चौकशीसाठी बोलावले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा