आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रमुख एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्याविरुद्ध कारवाई केली गेली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. न्यायालयाच्या या निर्देशांमुळे श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मयप्पन यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार आहे, याचा प्रस्ताव घेऊन येण्यासाठी न्यायालयाने बीसीसीआयला दुपारपर्यंतचा वेळ दिला आहे. मयप्पन यांच्याविरुद्ध कारवाई करायला हवी. त्यांच्यावर कारवाई करताना आम्हाला बीसीसीआयला बाजूला ठेवण्याची इच्छा नाही. त्यांच्यावर कारवाईसाठी काय पावले उचलता येईल?, असा प्रश्न न्यायालयाने विचारला.
याप्रकरणी कारवाईचे आदेश देण्याआधी न्यायालयने श्रीनिवासन यांच्यापुढे चार पर्याय ठेवले आहेत…
१. श्रीनिवासन यांनी स्वतःहून बीसीसीआयच्या प्रमुख पदावरून पायउतार व्हावे
२. मुदगल समितीने ज्यांच्यावर ठपका ठेवला आहे, त्यांच्यावर कारवाईसाठी समिती नेमण्यात यावी
३. बीसीसीआयच्या प्रशासक मंडळाने कारवाईचा निर्णय घ्यावा
४. मुदगल समितीनेच कारवाई निश्चित करावी

Story img Loader