Karnataka IPS Officer Harsh Bardhan : कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात एका आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्ष वर्धन असं या मृत अधिकाऱ्याचं नाव असून ते २०२३ च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी होते. दरम्यान, ही अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हर्ष वर्धन यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्ष वर्धन हे मध्य प्रदेशचे रहिवासी होते, अशी माहिती सांगितली जाते. हर्ष वर्धन हे पोलिसांच्या वाहनाने होलेनरसीपूर येथे त्यांच्या पहिल्या पोस्टिंगसाठी ड्युटीवर जात होते. मात्र, पहिल्या पोस्टिंगसाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान, हर्ष वर्धन यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलं होतं. त्यानंतर त्यांची आयपीएस अधिकारी म्‍हणून निवड झाली होती. आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती.

हेही वाचा : Supreme Court : “आम्ही जामीन दिला नी लगेच तुम्ही मंत्री झालात?”, आर्थिक अफरातफरीच्या आरोपीवर सुप्रीम कोर्ट लक्ष ठेवणार!

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्नाटक केडरमध्ये हर्ष वर्धन यांना पहिली पोस्‍टिंग मिळाली. पोस्‍टिंग मिळाल्यानंतर हर्षवर्धन हे आपल्या ड्युटीसाठी जात होते. मात्र, पोस्‍टिंगसाठी जात असतानाच कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात हर्ष वर्धन यांचा जागीच मृत्‍यू झाला. या घटनेनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान, समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या गाडीचा अचानक टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराला धडकली. ही धडक एवढी जोराची होती की गाडीचा संपूर्ण चक्काचूर झाला. तसेच गाडीत असलेल्या हर्ष वर्धन यांचा जागीच मृत्‍यू झाला. तसेच गाडीचा चालक देखील गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, हर्ष वर्धन हे सहायक पोलीस अधीक्षक म्‍हणून आपल्या पहिल्या पोस्‍टिंगसाठी कर्नाटकमधील हसन जिल्‍ह्यात झाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. गाडीचा अचानक टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे, असं पोलिसांनी सांगितलं. तसेच या अपघातात हर्ष वर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना येथील रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ips harsh bardhan accident news karnataka ips officer harsh bardhan dies in horrific accident in karnataka gkt