IPS अधिकारी रवि सिन्हा यांना आता रॉ चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. रवि सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. रवि सिन्हा आत्तापर्यंत कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव या पदावर कार्यरत होते. ते आता रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख असतील. काही वेळापूर्वीच ही घोषणा करण्यात आली. सध्याच्या रॉ चीफ सामंत गोयल यांची जागा ते घेतील. सामंत गोयल हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर रवि सिन्हा या पदावर बसतील आणि पुढची दोन वर्षे रॉचे प्रमुख म्हणून काम करतील.
चीन आणि भारत यांच्यात काहीसं तणावाचं वातावरण असताना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही रवि सिन्हा यांना देण्यात आली आहे. गुप्त माहिती आधुनिक तंत्राच्या मदतीने काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. रवि सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष पदावर कार्यरत आहेत. कॅबिनेटने त्यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवली आहे. १ जुलैपासून रवि सिन्हा पुढची दोन वर्षे रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील.
रवि सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रवि सिन्हा हे रॉच्या ऑपरेशनल डिव्हिजनचे प्रमुख म्हणूनही काम करत आहेत. माहिती आणि गुप्त माहिती गोळा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आधुनिक पद्धतीने ती गोळा करणं हे त्यांचं वैशिष्ट्य समजलं जातं.
रवि सिन्हा हे लो प्रोफाईल राहून माहिती काढण्याचं त्यांचं कौशल्य पणाला लावतात. गुप्तचर विभागात त्यांची ओळख व्यापक आहे. काश्मीर, पूर्वोत्तर भाग आणि दहशतवाद्यांचं क्षेत्र यातली माहिती मिळवण्यात, तिथे काय काय चाललं आहे हे समजून घेण्यात तिथल्या घटनाक्रमांचा अर्थ लावण्यात ते माहीर आहेत.