विवाहबाह्य़ संबंधांच्या आरोपावरून मध्य प्रदेशातील एका ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्यात आली आहे. ग्वाल्हेरचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक प्रमोद वर्मा यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक म्हणून भोपाळ येथील पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
प्रमोद वर्मा यांचे एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी संबंध असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने पोलीस महासंचालक नंदन दुबे यांच्याकडे केली. होती. याची गंभीर दखल घेऊन महासंचालकांनी हे प्रकरण महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांचा तपास करणाऱ्या विभागाकडे सोपविले. एका गंभीर मोहिमेसाठी काम करीत असल्याच्या नावाखाली वर्मा दिवसभर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यासमवेतच राहात असत, असे वर्मा यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराला हरकत घेतल्यानंतर वर्मा यांनी आपल्याला सदर मोहीम गुप्त असल्याने कोठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा