Iran Bandar Abbas Port Blast News: दक्षिण इराणच्या बंदर अब्बासमधील शाहिद राजाई बंदरात शनिवारी भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात ४ जणांचा मृत्यू तर ५०० हून अधिक झाले आहेत. या भीषण स्फोटानंतर घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे बंदरातील कामकाज थांबवण्यात आले आहे, अशी इराणच्या निम शासकिय वृत्तवाहिनी तस्निमने याबद्दल माहिती दिली आहे. येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे अनेक जण जखमी किंवा मृत्युमुखी पडले असू शकतात असेही या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
? Blast reported at Iran's Bandar Abbas port, cause unclear.
— Israel War Room (@IsraelWarRoom) April 26, 2025
— Iran International pic.twitter.com/OOvdldRm4N
The video below shows the massive scale of the explanation at the Shahid Rajaee Port in #Iran’s Bandar Abbas pic.twitter.com/hAYm3qmSBO
— Iran's Today (@Iran) April 26, 2025
ओमानमध्ये अमेरिकेबरोबर अणु चर्चेच्या तिसर्या फेरीला सुरुवात होत असतानाच इराणमध्ये हा स्फोट झाला, असे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे. दरम्यान या भीषण स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान या स्फोटामुळे अनेक किलोमीटर पर्यंतच्या घरांच्या काचा फुटल्याचे इराणच्या माध्यमांनी म्हटले आहे. या स्फोटाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूराचे लोट आकाशात पाहायला मिळत आहेत.
बंदर अब्बास हे इराणचे कंटेनर शिपमेंटसाठीचे प्रमुख केंद्र आहे, येथून दरवर्षी ८० दशलक्ष टन (७२.५ दशलक्ष मेट्रीक टन) मालाची वाहतूक केली जाते. हे बंदर तेहरानच्या आग्नेयेस सुमारे १,०५० किलोमीटर अंतरावर स्ट्रेट ऑफ हॉरमुझ ( Strait of Hormuz) जवळ आहे जेथून जगातील २० टक्के तेल जाते. २००० साली याच बंदरावरील संगणकांवर सायबर हल्ला करण्यात आला होता.