दुबई : ख्यातनाम लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा हात नसल्याचे इराणी सरकारने सोमवारी स्पष्ट केले. रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रथमच इराणने सार्वजनिक भाष्य केले आहे.

अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे सलमान रश्दी यांच्यावर एका कार्यक्रमात चाकूहल्ला करण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांनी इराणने यावर भाष्य केले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासर कनानी यांनी सांगितले की, ‘‘अमेरिकेत सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही. या हल्ल्यानंतर रश्दी यांच्या समर्थकांनी इराणवर कोणताही आरोप करू नये. इराणवर अशा प्रकारची चिखलफेक करण्याचा अधिकार कोणालाही नाही.’’ ७५ वर्षीय रश्दी यांच्यावर न्यू यॉर्कमध्ये एका २४ वर्षीय तरुणाने चाकूने हल्ला केला. रश्दी यांच्या यकृत, बाहू आणि डोळय़ाला जखमा झाल्या आहेत.

Story img Loader