एपी, दुबई
इराणमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चारपैकी कोणत्याही एका उमेदवाराला आवश्यक किमान ५० टक्के मते न मिळाल्यामुळे तिथे पुन्हा एकदा आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये इराणच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदारांनी सहभाग घेतला. आता ५ जुलैला फेरमतदान होईल.
इराणमध्ये मंदावलेली अर्थव्यवस्था, राजकीय व सामाजिक अस्थैर्य, सततची निदर्शने आणि पश्चिम आशियामधील तणावाची स्थिती यामुळे त्रस्त झालेल्या मतदारांनी शुक्रवारी सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियाँ यांना सर्वाधिक तर सईद जलिली या कट्टर, पुराणमतवादी नेत्याला दुसऱ्या क्रमांकाची मते दिली. मात्र, इराणमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी किमान ५० टक्के मते मिळणे आवश्यक असते. त्यामध्ये पेझेश्कियाँ कमी पडले. पेझेश्कियाँ हे हृदय शल्यविशारद असून ते इराणबाहेर फारसे प्रसिद्ध नाहीत. तर जलिली हे इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाटाघाटी करणारे नेते म्हणून बाहेरील जगाला ज्ञात आहेत.
हेही वाचा >>> ‘ईडी’कडून माकपची जमीन, बँक खाती जप्त; आर्थिक गैरव्यवहारात पक्ष सहभागी असल्याचा दावा
या मतदानाच्या माध्यमातून इराणच्या जनतेने आपण नेते आणि व्यवस्थेला नाकारत असल्याचा संदेश दिला असल्याचे मत चॅथम हाऊसच्या पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेच्या संचालक सनम वकील यांनी व्यक्त केले. यातून जनमताची उदासीनता, वैफल्य दिसून येते असे त्या म्हणाल्या. इराणच्या सुमारे ६.१० कोटी मतदारांपैकी जवळपास २.४५ कोटी जणांनी मतदान केले. त्यापैकी पेझेश्कियाँ यांना एक कोटी चार लाख इतकी तर जलिली यांना ९४ लाख मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील मोहम्मद बाघेर कालिबाफ यांना ३३ लाख मते मिळाली. इब्राहिम रियासी यांचा गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती.