रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा धसका संपूर्ण जगाने घेतलाय. या दोन्ही देशांमधील युद्ध आणखी चिघळले तर पूर्ण जगासाठी ही धोक्याची घंटा असेल असं म्हटलं जातंय. या युद्धाची झळ बसायला सुरुवातही झालीय. या दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरु असताना आता इराण आणि इराकमध्ये पुन्हा एकदा संघर्ष चिघळला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर चक्क १२ क्षेपणास्त्र डागले आहेत. या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून आखाती देशामधील या ठिणगीचे नंतर युद्धाच्या भडक्यात रुपांतर होते की काय ? असा प्रश्न सर्वांना पडतोय.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार इराकमधील ईरबील या शहरामधील अमेरिकी दूतावासाच्या परिसरात शेजारील देश इराणने तब्बल १२ क्षेपणास्त्रे डागले आहेत. याची पुष्टी अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी दिल्याचे असोशिएटेड प्रेसने सांगितले आहे. त्याचरोबर या हल्ल्यात अजूनतरी कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे इराणची शासकीय वृत्तसंस्था IRNA news एजन्सीने इराककडून इराणवर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला जातोय. मात्र हे हल्ले नेमके कोठून झाले याची माहिती इराण देत नाहीये, असं म्हटलं आहे.
#BREAKING: Reports several ballistic missiles hit the US base in Erbil pic.twitter.com/XMTXHDQs76
— Amichai Stein (@AmichaiStein1) March 12, 2022
दरम्यान, एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळतोय. रशियाने कीव्ह शहराच्या सीमेवरील हल्ले वाढवले आहेत. तर दुसरीकडे इराण आणि इराक यांच्यातील तणावामुळे जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.