पीटीआय, दुबई
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला असून इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा ताबा घेतला. हे जहाज इस्रायलशी संबंधित असून हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडो जहाजावर उतरले, असे वृत्त इराणच्या सरकारी ‘आयआरएए’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या जहाजातील १७ कर्मचारी भारतीय असून त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
यूएईहून मुंबईकडे निघालेल्या ‘एमएससी एरीज’ या मालवाहू जहाजावर पोर्तुगालचा ध्वज आहे. लंडनस्थित झोडियाक मेरिटाइमशी या कंपनीशी संबंधित हे जहाज असून ‘झोडियाक ग्रुप’ ही कंपनी इस्रायली अब्जाधीश इयाल ऑफेर यांच्या मालकीची आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत हे जहाज आले असता इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडो हेलिकॉप्टरने या जहाजावर उतरले आणि जहाजाचा ताबा घेतला, अशी माहिती ‘आयआरएए’ने दिली. जहाजावर एकूण २५ कर्मचारी आहेत.
हेही वाचा >>>दिल्लीत भाजपची हॅट्ट्रिक, की आप- काँग्रेसला कौल?
इस्रायलने १ एप्रिल रोजी इराणच्या सीरियामधील दूतावासावर हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ‘रिव्हॉल्यूशनरी गाडर्स्’चे सात कर्मचारी मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणने दिल्यानंतर शनिवारी इस्रायलशी संबंधित जहाज ताब्यात घेण्यात आले.
इराणला इस्रायलचा इशारा
मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर इस्रायलने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत इराणला या कृत्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे सांगितले. इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की इराणने ही परिस्थिती आणखी वाढवू नये. नाहीतर त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. इस्रायलचे परराष्ट्मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी इराण चाचेगिरी करत असून त्यासाठी त्यांना मंजुरी दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हेही वाचा >>>केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
सागरी वाहतूक बंद?
इराणने इस्रायलला बदला घेण्याची धमकी दिल्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून ते सागरी वाहतूक बंद करू शकतात. रिव्होल्युशनरी गार्ड्सचे नौदल प्रमुख अलिरेझा तंगसिरी यांनी मंगळवारीच सांगितले होते की ते आवश्यक वाटल्यास होर्मुझची सामुद्रधुनी बंद करू शकतात. इराणचे समर्थन असलेल्या येमेनच्या हुती बंडखोरांनी काही महिन्यांपूर्वी लाल समुद्रातील जहाजावर हल्ला करून जागतिक व्यापार विस्कळीत केला होता.
राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी बायडेन यांची चर्चा
इस्रायल व इराण यांच्यातील तणाव वाढल्याने अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन शनिवारी तातडीने वॉशिंग्टनला परतले. पश्चिम आशियातील घटनांबाबत ते तातडीने राष्ट्रीय सुरक्षा पथकाशी चर्चा करणार आहेत. डेलावेअर येथे त्यांच्या निवासस्थानी शनिवार-रविवार आराम करण्यासाठी बायडेन गेले होते. मात्र शनिवारी दुपारी ते तातडीने व्हाइट हाऊसला परतण्यासाठी निघाले. बायडेन यांनी शुक्रवारी इस्रायलच्या संरक्षणासाठी आम्ही समर्पित असल्याचे सांगितले होते. इस्रायलच्या रक्षणासाठी आम्ही मदत करू आणि इराण यशस्वी होणार नाही, असे त्यांनी सांगितले होते.
सुटकेसाठी भारताचे प्रयत्न
इराणने ताब्यात घेतलेल्या मालवाहू जहाजात १७ भारतीय कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय नागरिकांची सुरक्षा, कल्याण आणि सुटका सुनिश्चित करण्यासाठी तेहरान आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमान कंपन्यांकडून इराणची हवाई हद्द टाळण्याचा निर्णय
इराण व इस्रायलच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांनी इराणी हवाई क्षेत्र टाळण्याचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपन्यांना युरोप आणि आखाती देशांसाठी उड्डाण मार्ग बदलणार आहेत. ‘एअर इंडिया’ व ‘विस्तारा’ या प्रमुख कंपन्यांनी भारत सरकारच्या सल्ल्याने नागरिकांना इराणच्या प्रवासापासून दूर राहण्याचे आवाहन केल्यानंतर हवाई क्षेत्र टाळण्याचा पर्याय निवडला.