भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे सध्या वाद सुरु असताना भारत आणि इराणमध्ये चर्चा झाली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांची बुधवारी भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. वादग्रस्त वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील अनेक देशांत असंतोषाचे वातावरण असताना ही भेट झाली असल्याने महत्त्वाची समजण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर इराकसह इराण, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, युएई, इराण, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहारिन, मालदिव, लिबया आणि इंडोनेशिया देशांनी १५ देशांनी निषेध नोंदवला असताना या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष आहे. या दौऱ्यात अब्दुल्लाहियन यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडेही वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला.
एस. जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर चर्चा
“द्विपक्षीय धोरणात्मक संबंध वाढवण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी, एस जयशंकर आणि इतर भारतीय अधिकाऱ्यांची भेट झाली. तेहरान आणि दिल्ली एकमेकांच्या धर्माचा आदर तसंच इस्लामचं पावित्र्य राखण्यावर आणि द्वेष पसरवणारी वक्तव्यं न करण्यावर सहमत आहेत. दोन्ही देशांमधील संबंध अजून दृढ करण्याचा आमचा निर्धार आहे,” असं ट्वीट अब्दुल्लाहियन यांनी बुधवारी रात्री केलं.
दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने या भेटीनंतर दिलेल्या माहितीत अब्दुल्लाहियन यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह विधानामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारताने पुन्हा एकदा इस्लामच्या संस्थापकांप्रती असलेला आदर व्यक्त केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दोषींना अशी शिक्षा केली जाईल की इतरांनाही धडा मिळेल असं आश्वासन दिल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणने दिलेल्या या माहितीवर भारताकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अब्दुल्लाहियन यांनी यावेळी भारतीय आणि भारत सरकारचं कौतुक केलं असल्याचंही इराणने सांगितलं आहे. भारतीय अधिकारी दोषींना ज्याप्रकारे हाताळत आहेत त्यावर मुस्लिम समाधानी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं असून दिल्लीमधील माध्यम प्रमुख नवीन जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
अब्दुल्लाहियन हे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अफगाणिस्तानसह अन्य आंतराष्ट्रीय मुद्यांवर या भेटीदरम्यान चर्चा करण्याचा उद्देश आहे. नवी दिल्लीतील बैठकीनंतर अब्दुल्लाहियन हे मुंबई आणि हैदराबादला भेट देणार आहेत.