Iran Hijab Protest: इराणमध्ये मुस्लीम महिलांवर हिजाब घालण्याची सक्ती केली जात आहे. इराणच्या विद्यापीठातही विद्यार्थी आणि महिलांना हिजाबसक्ती करण्यात आली आहे. या सक्तीविरोधात एका विद्यार्थीनीने निर्वस्त्र होत आंदोलन केले आहे. सदर आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची माहिती जगभरात पसरली. इराणच्या इस्लामिक आझाद विद्यापीठातील एक महिला निर्वस्त्र होऊन विद्यापीठ संकुलात वावरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. इराणी विद्यार्थ्यांशी संबंधित अमीर कबीर या वृत्तसंकेतस्थळाने सदर व्हिडीओ पहिल्यांदा पोस्ट केला. त्यानंतर पर्शियन भाषेतील प्रमुख माध्यमांनी सदर व्हिडीओची दखल घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विद्यार्थीनी मानसिक तणावात असल्याचा विद्यापीठाचा दावा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठावर टीका होऊ लागली. यानंतर विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजूब यांनी एक्सवर पोस्ट टाकत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “पोलिसांच्या चौकशीत सदर विद्यार्थीनी मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.” पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सदर विद्यार्थीनी कुठे आहे याची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. इराणच्या हमशहरी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर विद्यार्थीनीला मनोरुग्णालयात पाठविण्यात आले.

अटक करताना झाली मारहाण

आंदोलनकारी विद्यार्थीनीला ताब्यात घेताना मारहाण करण्यात आल्याचा दावा अमीर कबीर वृत्तसंकेतस्थळाने केला आहे. यानंतर ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. इराणने सदर विद्यार्थीनीला ताबडतोब सोडले पाहीजे, अशी मागणी करण्यात आली आहे. तिला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असून तात्काळ वकील नेमून द्यावा आणि कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

२०२२ सालीही इराणमध्ये हिजाब विरोधात आंदोलन उसळले होते. म्हासा अमिनी या महिलेने हिजाबशी संबंधित नियम मोडल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. मात्र अटकेत असतानाच तिचा मृत्यू झाला, त्यानंतर इराणमधील महिलांनी रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त केला होता. आंदोलक महिलांनी एकत्र येत डोक्यावरचा स्कार्फ काढून त्याची सामूहिक होळी पेटवली होती. हे आंदोलन दडपण्यासाठी इराणी सरकारने बळाचा वापर केला, ज्यामध्ये ५५१ जणांचा मृत्यू झाला होता. तर हजारो लोकांना अटक झाली.