इराणमध्ये पोलीस कोठडीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये अशांतता पसरली आहे. इराणमधील युवक, तरूणी तसेच सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून मोरॅलिटी पोलीस आणि इराण प्रशासनाविरोधात निदर्शनं केली जात आहेत. दरम्यान, मागील तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या या आंदोलनावर इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या अशांततेमागे अमेरिका आणि इस्त्रायलचं षडयंत्र आहे, असे खामेनी म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली; ICU मधून आता CCU मध्ये केलं दाखल

इराणमध्ये काही दिवसांपूर्वी २२ वर्षीय महिला महसा अमिनी यांचा मोरॅलिटी पोलिसांच्या कोठडीत असताना मृत्यू झाला होता. हिजाब योग्य पद्धतीने परिधान न केल्यामुळे महसा अमिनी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सर्वत्र अशांतता पसरली असून मागील तीन आठवड्यांपासून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे. या आंदोलनात अनेक नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. इराणमधील या परिस्थितीवर तेथील सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी सोमवारी (३ ऑक्टोबर) पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इराणमधील अशांततेस अमेरिका आणि इस्त्रायलला जबाबदार धरले आहे. तसेच महसा अमिनी यांच्या मृत्यूची घटना खेदजनक असून ती एक दु:खद घटना आहे, असे अयातुल्ला म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> शेतात विवस्र आढळलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी काढला पळ, ‘यूपी’तील घटनेचा धक्कादायक VIDEO

इराणमधील दंगली या नियोजित होत्या. या दंगलींचे नियोजन अमेरिका आणि इस्त्रायल या देशांनी केले आहे. मशिदी, बँका, पोलिसांची वाहने यांना आग लावून देणे हे अनैसर्गिक असल्याचेही अयातुल्ला खान म्हणाले आहेत. विशेष म्हणजे अयातुल्ला खान यांच्याप्रमाणेच येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही अन्य देशांना तसेच विरोधकांना जबाबदार धरले आहे.

हेही वाचा >>> स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर; कोण आहेत स्वांते पाबो? जाणून घ्या

दरम्यान, महसा अमिनी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ९ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी तेहरानमध्ये अजूनही आंदोलन सुरूच आहे. काही ठिकाणी दंगली होत असून पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. ज्या भागात आंदोलन आणि दंगलीच्या घटना घडत आहेत, तेथे इंरटनेट आणि सोशल मीडिया अॅप्स बंद करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran supreme leader ayatollah ali khamenei comments on mahsa amini death row prd