इराणला रशिया २०१५ च्या अखेरीपर्यंत एस ३०० प्रकारची संरक्षण क्षेपणास्त्रे देणार आहे, असे इराणच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. रशियाकडे या क्षेपणास्त्रांची मागणी इराणने आधीच नोंदवली होती. इराणचे संरक्षण मंत्री होसेन देघान यांनी सांगितले की, आम्ही रशियाबरोबर करार केला असून ही क्षेपणास्त्रे वर्षअखेरीपर्यंत मिळतील. इराणी सैन्याला रशियात जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे. रशियन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन या संस्थेने इराणशी एस ३०० क्षेपणास्त्रे देण्याचा करार केला आहे. रशियाने २०१० पासून इराणला क्षेपणास्त्रे विकण्यावर असलेले र्निबध उठवले होते. रशियाच्या या निर्णयाने इस्रायलने चिंता व्यक्त केली असून र्निबध उठवण्याआधीच क्षेपणास्त्रे देण्याचा करार केल्याबाबत अमेरिकेने नाराजी व्यक्त केली. रोस्टेकचे महासंचालक सर्जेई चेमेझोव यांनी सांगितले की, क्षेपणास्त्रांचा करार २००७ मध्येच झाला होता. रशिया इराणला आधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार आहे.