Iranian Chess Player : ईराणची बुद्धिबळपटू सारा खादेम (Sara Khadem) जिने हिजाब हटवून या स्पर्धेत सहभागी झाली होती त्याच साराला आता स्पेनचं नागरिकत्व मिळालं आहे. साराने डिसेंबर २०२२ मध्ये कझाकिस्तान या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत हिजाब न घालता भाग घेतला होता. यानंतर इराणने तिचा निषेध केला होता. आपल्यावर काही कारवाई होऊ नये म्हणून सारा खादेम जानेवारी महिन्यातच स्पेनला गेली होती. इराणमधे साराच्या विरोधात अटक वॉरंट लागू करण्यात आलं होतं.

इराणच्या या बुद्धिबळपटू सारा खादेमला स्पॅनिश नागरिकत्व देण्यात आलं आहे. स्पेन सरकारनेच या विषयीची माहिती दिली. सारा खादेमने कझाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी तिने हिजाब न परिधान करता खेळ खेळला. ही बाब इराणच्या इस्लामिक ड्रेसकोड नियमाच्या विरोधात होती.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Taylor Fritz and Frances Tiafoe of the United States in the men singles semifinals at the US Open sport news
फ्रिट्झची उपांत्य फेरीत धडक, टियाफोचे आव्हान; महिलांमध्ये नवारो-सबालेन्का एकमेकांसमोर
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Emma Navarro defeated Coco Goff at the US Open Grand Slam tennis tournament sports news
धक्कादायक निकालांची मालिका कायम! गतविजेत्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Pakistani Christian Joseph Pereira is 1st Goan to get Indian citizenship under CAA
Citizenship under CAA: ७८ वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीला CAA अंतर्गत मिळाले नागरिकत्व; म्हणाले, “मरण्याच्या आधी…”

स्पेनचे कायदा मंत्री पिलर होप यांच्या हवाल्याने एका अधिकाऱ्याने ही बाब स्पष्ट केली की तिथल्या कॅबिनेटने मंगळवारी (२५ जुलै) सारा खादेमवर ओढवलेली विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता तिला स्पेनचं नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

मी पडद्यात राहू शकत नाही

सारा खादेम ही जेव्हा स्पेनला आली तेव्हा तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावेळी तिने हे म्हटलं होतं की मला पडद्यात रहायला आवडत नाही. त्यामुळेच मी आता यापुढे हिजाब घालणार नाही असा निर्णय घेतला आहे. स्पेनमध्ये आल्यानंतर सारा खादेमने पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचीही भेट घेतली तसंच त्यांच्यासह तिने बुद्धिबळाचा डावही खेळला. रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.

निवृत्त बुद्धिबळ रेफरी शोहरेह बयारत यांनी जानेवारी महिन्यात हे म्हटलं होतं की इराणच्या बुद्धिबळपटू किंवा इतर महिला खेळाडू जेव्हा स्पर्धांमध्ये भाग घेतात तेव्हा त्यांना हिजाब घालणं हे अनिवार्य आहे. हिजाब घातला नाही तर निषेध नोंदवला जातो, प्रसंगी कुटुंबालाही त्रास दिला जातो त्यांच्यावर हल्लाही केला जातो असं बयारत यांनी म्हटलं आहे.